६१९. उशिराचं शहाणपण
असतात आपल्या इच्छा काही
असतात आपली काही स्वप्नं
ती प्राप्त करण्यासाठीच
करत असतो आपण प्रयत्न
पहिला प्रयत्न फसतो आपला
होत नाही तरीही निराश
पुन्हा उठतो आणि करतो
नव्या जोमाने नवी सुरुवात
फसत जातात प्रयत्न आपले
घ्यावीशी वाटत नाही माघार
मानत नसतं मन तरी
करावं लागतं वास्तव स्विकार
कळतं आपल्याला हळूहळू
होत जातं चित्र स्पष्ट
आपल्याला हवी असलेली ती
नशिबामध्येच नसते गोष्ट
--- लबाड बोका
असतात आपल्या इच्छा काही
असतात आपली काही स्वप्नं
ती प्राप्त करण्यासाठीच
करत असतो आपण प्रयत्न
पहिला प्रयत्न फसतो आपला
होत नाही तरीही निराश
पुन्हा उठतो आणि करतो
नव्या जोमाने नवी सुरुवात
फसत जातात प्रयत्न आपले
घ्यावीशी वाटत नाही माघार
मानत नसतं मन तरी
करावं लागतं वास्तव स्विकार
कळतं आपल्याला हळूहळू
होत जातं चित्र स्पष्ट
आपल्याला हवी असलेली ती
नशिबामध्येच नसते गोष्ट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा