६१८. भडास
मेला साला एकदाचा
मरता नव्हता मरत
मेला मेला म्हणताना
जिवंत व्हायचा परत
खूप दिला होता त्रास
त्याने सगळ्याच लोकांना
मुद्दाम ठोकत बसायचा खिळे
कुणा कुणाच्या भोकांना
खूप होता माज त्याला
खूप होती गुर्मी
खूप होती मस्ती आणि
खूप होती चरबी
गेलंच शेवटी संपून सगळं
पडला होता आडवा
गेलो होतो पोहोचवायला
करून चेहरा रडवा
बरं झालं मेला तो ते
गेली एकदाची पिडा
सुटेल वाटतं आतातरी
जुना सगळा तिढा
--- लबाड बोका
मेला साला एकदाचा
मरता नव्हता मरत
मेला मेला म्हणताना
जिवंत व्हायचा परत
खूप दिला होता त्रास
त्याने सगळ्याच लोकांना
मुद्दाम ठोकत बसायचा खिळे
कुणा कुणाच्या भोकांना
खूप होता माज त्याला
खूप होती गुर्मी
खूप होती मस्ती आणि
खूप होती चरबी
गेलंच शेवटी संपून सगळं
पडला होता आडवा
गेलो होतो पोहोचवायला
करून चेहरा रडवा
बरं झालं मेला तो ते
गेली एकदाची पिडा
सुटेल वाटतं आतातरी
जुना सगळा तिढा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा