६२३. चाहूल
काळ्याशार डोहामध्ये
आरसपाणी सावल्या
अदृष्टाच्या वाटेवरती
अदृष्टाच्या बावल्या
गर्द काळ्या अंधारातून
रातकीड्यांची किरकिर
अज्ञाताच्या भवतालातून
आळवतो कोणी फकीर
पिंजारलेल्या फांद्यांचा
खुणावणारा पिंपळ
पायाखालून सळसळणारी
अदृश्यशी सळसळ
धडधडणाऱ्या हृदयासंगे
अडखळणारे पाऊल
ओवाळलेल्या उताऱ्यावरती
कोणाचीतरी चाहूल
--- लबाड बोका
काळ्याशार डोहामध्ये
आरसपाणी सावल्या
अदृष्टाच्या वाटेवरती
अदृष्टाच्या बावल्या
गर्द काळ्या अंधारातून
रातकीड्यांची किरकिर
अज्ञाताच्या भवतालातून
आळवतो कोणी फकीर
पिंजारलेल्या फांद्यांचा
खुणावणारा पिंपळ
पायाखालून सळसळणारी
अदृश्यशी सळसळ
धडधडणाऱ्या हृदयासंगे
अडखळणारे पाऊल
ओवाळलेल्या उताऱ्यावरती
कोणाचीतरी चाहूल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा