६२२. सल
कशी कशी असतात माणसं
निर्लज्ज आणि कोडगी
स्पष्ट वागतो तोडून तरी
पडत असतात गळी
चाहूल त्यांची लागली तरी
जाऊ पहातो सटकून
चिकटतात साली जळू सारखी
जातही नाहीत झटकून
लबाड तर असतात इतकी
करतात आपलाच उपयोग
वाटत रहातं मनात सारखं
कसले भोगतोय भोग
टाळता येत नाही त्यांना
खूपच वाटतं हतबल
मनामध्ये राहिला आहे
तो ही एक सल
--- लबाड बोका
कशी कशी असतात माणसं
निर्लज्ज आणि कोडगी
स्पष्ट वागतो तोडून तरी
पडत असतात गळी
चाहूल त्यांची लागली तरी
जाऊ पहातो सटकून
चिकटतात साली जळू सारखी
जातही नाहीत झटकून
लबाड तर असतात इतकी
करतात आपलाच उपयोग
वाटत रहातं मनात सारखं
कसले भोगतोय भोग
टाळता येत नाही त्यांना
खूपच वाटतं हतबल
मनामध्ये राहिला आहे
तो ही एक सल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा