६२४. गूढ
गावाजवळच आहे एक
खूप जुनी बारव
रात्री तिथून ऐकू येतो
कोणाचातरी पायरव
हिम्मत नाही होत कोणाची
रात्री जायची तिथे
बारवेमधून कोणीतरी
पाणी काढून पिते
अवसे पुनवेच्या रात्री तर
असतो विशेष साज
घुंगरांची काठी टेकत टेकत
असतं कोणी जात
कधी कधी तर कोणी तिथून
मारत असतं हाका
ऐकत असतो सारा गाव
पण कोणीच नाही खमका
कधी कधी रात्री अपरात्री
पेटते तिथे चूड
माहित नाही कोणाला काही
काय आहे ते गूढ
--- लबाड बोका
गावाजवळच आहे एक
खूप जुनी बारव
रात्री तिथून ऐकू येतो
कोणाचातरी पायरव
हिम्मत नाही होत कोणाची
रात्री जायची तिथे
बारवेमधून कोणीतरी
पाणी काढून पिते
अवसे पुनवेच्या रात्री तर
असतो विशेष साज
घुंगरांची काठी टेकत टेकत
असतं कोणी जात
कधी कधी तर कोणी तिथून
मारत असतं हाका
ऐकत असतो सारा गाव
पण कोणीच नाही खमका
कधी कधी रात्री अपरात्री
पेटते तिथे चूड
माहित नाही कोणाला काही
काय आहे ते गूढ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा