६१३. निराशा
हर एक गोष्ट मिळवण्यासाठी
झगडावं लागतं सारखं
छोट्या छोट्या सुखालाही
व्हायला होतं पारखं
त्यापायी घालवलेला अन्
वेळही जातो फुकट
त्रासातून त्या बाहेर पडणं
ते ही असतं बिकट
प्रयत्न तरी किती करायचे
त्यालाही असते सीमा
सोडावाच लागतो नाद शेवटी
जोरही पडतो धीमा
प्रयत्नांती परमेश्वर म्हणे
हे जर असतं खरं
सगळेच झाले असते सुखी
झालं असतं बरं
उगाच सांगतात खोटं काही
उगाच लावतात आशा
होत असतं तसं क्वचितच
बाकी फक्त निराशा
-- लबाड बोका
हर एक गोष्ट मिळवण्यासाठी
झगडावं लागतं सारखं
छोट्या छोट्या सुखालाही
व्हायला होतं पारखं
त्यापायी घालवलेला अन्
वेळही जातो फुकट
त्रासातून त्या बाहेर पडणं
ते ही असतं बिकट
प्रयत्न तरी किती करायचे
त्यालाही असते सीमा
सोडावाच लागतो नाद शेवटी
जोरही पडतो धीमा
प्रयत्नांती परमेश्वर म्हणे
हे जर असतं खरं
सगळेच झाले असते सुखी
झालं असतं बरं
उगाच सांगतात खोटं काही
उगाच लावतात आशा
होत असतं तसं क्वचितच
बाकी फक्त निराशा
-- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा