६१४. आदिम सनातन
उत्कट आणि आसुसलेल्या
भावनांनी मी साद घालतो
तेव्हा तुझा आदिम सनातन
वाऱ्यावरती पदर हालतो
देत रहातो मी ही निरंतर
पुन्हा पुन्हा थोडा झटका
तेव्हा तुझा आदिम सनातन
विरोध सुद्धा पडतो लटका
उठू लागते वादळ आणि
तापू लागते कुंद हवा
तेव्हा तुझा आदिम सनातन
पाय घसरतो नवा नवा
--- लबाड बोका
उत्कट आणि आसुसलेल्या
भावनांनी मी साद घालतो
तेव्हा तुझा आदिम सनातन
वाऱ्यावरती पदर हालतो
देत रहातो मी ही निरंतर
पुन्हा पुन्हा थोडा झटका
तेव्हा तुझा आदिम सनातन
विरोध सुद्धा पडतो लटका
उठू लागते वादळ आणि
तापू लागते कुंद हवा
तेव्हा तुझा आदिम सनातन
पाय घसरतो नवा नवा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा