६१६. नाकलन
कुडमुड्या क्षितिजावरती
निवते प्रकाशमान
मुंग्यांच्या वारूळाला
धरित्रीचे वरताण
रंग बावरा पक्षी
मातर कातर वेळी
अज्ञात प्रदेशामधूनी
कोळून जातो मेळी
काही काळापुरते
किंवा नुसते गाळातून
रूप बंधातील वलये
आश्वस्त भांगांतून
स्थलांतरित होणाऱ्या
आरपार संकराचीही
आजघडीला नव्हती
वहिवाट कंकराचीही
घनघोर मुर्दाड वस्त्या
टोलेजंग विचित्र
कोटींमध्ये अनैसर्गिक
पायपुसणी चित्रं
कल्पनातीत गैरसमजाला
सुखवस्तू निव्वळ बाळसे
जगण्याचाही प्रवाह
नवेच हळवे वळसे
निर्वासित आभाळाला
कचकचित ऊद्गार
शब्दांतूनी अभिव्यक्ती
उघडून घे तू दार
शब्द सख्या भंगल्यांनो
करा मरा अवमूल्यन
कळते तरीही थोडे
उदार कृपया नाकलन
--- लबाड बोका
कुडमुड्या क्षितिजावरती
निवते प्रकाशमान
मुंग्यांच्या वारूळाला
धरित्रीचे वरताण
रंग बावरा पक्षी
मातर कातर वेळी
अज्ञात प्रदेशामधूनी
कोळून जातो मेळी
काही काळापुरते
किंवा नुसते गाळातून
रूप बंधातील वलये
आश्वस्त भांगांतून
स्थलांतरित होणाऱ्या
आरपार संकराचीही
आजघडीला नव्हती
वहिवाट कंकराचीही
घनघोर मुर्दाड वस्त्या
टोलेजंग विचित्र
कोटींमध्ये अनैसर्गिक
पायपुसणी चित्रं
कल्पनातीत गैरसमजाला
सुखवस्तू निव्वळ बाळसे
जगण्याचाही प्रवाह
नवेच हळवे वळसे
निर्वासित आभाळाला
कचकचित ऊद्गार
शब्दांतूनी अभिव्यक्ती
उघडून घे तू दार
शब्द सख्या भंगल्यांनो
करा मरा अवमूल्यन
कळते तरीही थोडे
उदार कृपया नाकलन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा