६१५. फसवणूक
किती म्हणून करता हो
देवाची हाजी हाजी
वाहात असता धोंड्यांना
रोज फुलं ताजी
रोज सकाळ संध्याकाळ
पेटवत असता दिवा
धूप कापूर जाळून
खराब करता हवा
वर्षानुवर्षं लाचारीने
त्याच म्हणता आरत्या
वाचत असता मूढपणे
त्याच खोट्या पोथ्या
जेव्हा बघावं तेव्हा
दिसत असता अगतिक
कसली ना कसली तरी
देवाकडे मागता भिक
दिखाव्याने भक्तीच्या
करून घेता कवतुक
कशासाठी म्हणून अशी
करून घेता फसवणूक
--- लबाड बोका
किती म्हणून करता हो
देवाची हाजी हाजी
वाहात असता धोंड्यांना
रोज फुलं ताजी
रोज सकाळ संध्याकाळ
पेटवत असता दिवा
धूप कापूर जाळून
खराब करता हवा
वर्षानुवर्षं लाचारीने
त्याच म्हणता आरत्या
वाचत असता मूढपणे
त्याच खोट्या पोथ्या
जेव्हा बघावं तेव्हा
दिसत असता अगतिक
कसली ना कसली तरी
देवाकडे मागता भिक
दिखाव्याने भक्तीच्या
करून घेता कवतुक
कशासाठी म्हणून अशी
करून घेता फसवणूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा