६२५. प्रवास
माहित नसतं आधी आणि
माहित नसतं नंतर
पहिल्या शेवटच्या पावलांमधलं
माहित नसतं अंतर
कुठे कसं काय केव्हा
काहीच नसतं निश्चित
तरी सुद्धा असतो आपण
काही ना काही इच्छित
जन्मापासून मरणापर्यंत
आत्मा करतो वास
अज्ञाताकडून अज्ञाताकडे
करत असतो प्रवास
--- लबाड बोका
माहित नसतं आधी आणि
माहित नसतं नंतर
पहिल्या शेवटच्या पावलांमधलं
माहित नसतं अंतर
कुठे कसं काय केव्हा
काहीच नसतं निश्चित
तरी सुद्धा असतो आपण
काही ना काही इच्छित
जन्मापासून मरणापर्यंत
आत्मा करतो वास
अज्ञाताकडून अज्ञाताकडे
करत असतो प्रवास
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा