६२१. निरोप
इतक्या जवळ असून सुद्धा
गेलो आपण किती दूर
इतके प्रयत्न करून सुद्धा
जुळलेच नाहीत आपले सूर
रोज ऐकतो एकमेकांना
आणि असतो रोज पहात
तरी फक्त असतो आपण
आपापल्याच कोशात रहात
इतका आलाय कडवटपणा
आता आपल्या नात्यात
राहिले सुद्धा नाहीत आता
कोणतेच बाण भात्यात
झाली आहे वेळ आता
काही उपाय करण्याची
एकमेकांच्या आयुष्यातून
कायमचं निघून जाण्याची
--- लबाड बोका
इतक्या जवळ असून सुद्धा
गेलो आपण किती दूर
इतके प्रयत्न करून सुद्धा
जुळलेच नाहीत आपले सूर
रोज ऐकतो एकमेकांना
आणि असतो रोज पहात
तरी फक्त असतो आपण
आपापल्याच कोशात रहात
इतका आलाय कडवटपणा
आता आपल्या नात्यात
राहिले सुद्धा नाहीत आता
कोणतेच बाण भात्यात
झाली आहे वेळ आता
काही उपाय करण्याची
एकमेकांच्या आयुष्यातून
कायमचं निघून जाण्याची
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा