६३१. अमूर्त
पहिला आणि शेवटचा
एक दिर्घ श्वास
अनावर्ताचा अनावरतेने
मांडला होता खास
तबकडीच्या काठाभोवती
काळं काळं वर्तुळ
तुकडे तुकडे साली साली
कंद कंद सरगूळ
काळा करपट भाकर तुकडा
साचतो आहे गाळ
फांदीवरच्या पानांखाली
उगाच खोटा आळ
बंद डोळे बंद स्वप्ने
निळं शाही मेण
वांझोट्या ह्या रस्त्यावरती
थब थब पडतं शेण
दाणा दाणा टिपूस टिपूस
वर खाली आभाळ
करकरणाऱ्या चोचीमध्ये
मंदसर वर जाळ
थेंब उन्हाचा परका परका
झाडांवरती थार
ओका बोका ओक्साबोक्शी
पिवळा पिंपळपार
असलंच काही नातंगोतं
तांबडे पांढरे रंग
अर्ध्या तुटल्या झावळ्यांचा
आणखी वचनभंग
दोन दिशांना मौन पाळीत
थोडासाच उतार
मध्यावरती लोंबकळणारा
स्पर्श स्पर्श अवतार
चार चर थोडी चौकट
उलट सुलट नक्षी
एकट काटा फिरतो आहे
फडफडणारा पक्षी
शोधून पाहिलं सारं विश्व
तरीही काही उरतं
मेंदूमध्ये पाझरतंय
धुसर काही अमूर्त
--- लबाड बोका
पहिला आणि शेवटचा
एक दिर्घ श्वास
अनावर्ताचा अनावरतेने
मांडला होता खास
तबकडीच्या काठाभोवती
काळं काळं वर्तुळ
तुकडे तुकडे साली साली
कंद कंद सरगूळ
काळा करपट भाकर तुकडा
साचतो आहे गाळ
फांदीवरच्या पानांखाली
उगाच खोटा आळ
बंद डोळे बंद स्वप्ने
निळं शाही मेण
वांझोट्या ह्या रस्त्यावरती
थब थब पडतं शेण
दाणा दाणा टिपूस टिपूस
वर खाली आभाळ
करकरणाऱ्या चोचीमध्ये
मंदसर वर जाळ
थेंब उन्हाचा परका परका
झाडांवरती थार
ओका बोका ओक्साबोक्शी
पिवळा पिंपळपार
असलंच काही नातंगोतं
तांबडे पांढरे रंग
अर्ध्या तुटल्या झावळ्यांचा
आणखी वचनभंग
दोन दिशांना मौन पाळीत
थोडासाच उतार
मध्यावरती लोंबकळणारा
स्पर्श स्पर्श अवतार
चार चर थोडी चौकट
उलट सुलट नक्षी
एकट काटा फिरतो आहे
फडफडणारा पक्षी
शोधून पाहिलं सारं विश्व
तरीही काही उरतं
मेंदूमध्ये पाझरतंय
धुसर काही अमूर्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा