६३२. भूल
वादासाठी नाही म्हणत
घेतोय सत्त्याचा शोध
मी सुद्धा शोधतोय ईश्वर
होतच नाही बोध
दे सोडून दुराग्रह तुझा
लाग सत्त्याच्या मागे
व्हायचं असेल खरंच तुला
झोपेमधून जागे
श्रद्धा भक्ती पूजा आरती
आहे मायाजाल
त्याच्यापासून वाचण्यासाठी
सत्त्याचीच वापर ढाल
जाणूनच नसेल घ्यायचं सत्त्य
रहा असत्त्यात मश्गुल
देव कसा भेटेल मग
नुसतीच पडेल भूल
--- लबाड बोका
वादासाठी नाही म्हणत
घेतोय सत्त्याचा शोध
मी सुद्धा शोधतोय ईश्वर
होतच नाही बोध
दे सोडून दुराग्रह तुझा
लाग सत्त्याच्या मागे
व्हायचं असेल खरंच तुला
झोपेमधून जागे
श्रद्धा भक्ती पूजा आरती
आहे मायाजाल
त्याच्यापासून वाचण्यासाठी
सत्त्याचीच वापर ढाल
जाणूनच नसेल घ्यायचं सत्त्य
रहा असत्त्यात मश्गुल
देव कसा भेटेल मग
नुसतीच पडेल भूल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा