६३३. परखड
देवाच्या अस्तित्वाच्या गोष्टी
असत्या जर का तत्थ्या
कशाला मग झाल्या असत्या
निष्पाप जीवांच्या हत्त्या
धावला असता संकटामध्ये
हाकेला जर देव
कशाला मग फुटलं असतं
आत्महत्त्यांचं पेव
खरंच जर होत असता
असा कोणाला साक्षात्कार
कशाला मग झाले असते
बायकांवरती बलात्कार
तरीही म्हणाल पूर्वजन्मी
दिलं असेल दुख्ख
तुमचं सुद्धा होईल वाईट
ह्याजन्मी नसताना चूक
--- लबाड बोका
देवाच्या अस्तित्वाच्या गोष्टी
असत्या जर का तत्थ्या
कशाला मग झाल्या असत्या
निष्पाप जीवांच्या हत्त्या
धावला असता संकटामध्ये
हाकेला जर देव
कशाला मग फुटलं असतं
आत्महत्त्यांचं पेव
खरंच जर होत असता
असा कोणाला साक्षात्कार
कशाला मग झाले असते
बायकांवरती बलात्कार
तरीही म्हणाल पूर्वजन्मी
दिलं असेल दुख्ख
तुमचं सुद्धा होईल वाईट
ह्याजन्मी नसताना चूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा