६३५. शब्द सौंदर्य
शब्दच दिसतात जिथे तिथे
शब्दांचंच मला लागलंय वेड
काढावीशी वाटली कोणाची
शब्दांनीच मी काढतो छेड
करायच्या जरी झाल्या तरी
शब्दांनीच मी करतो चुका
आणि घ्यावासा वाटला तर
शब्दांनीच मी घेतो मुका
कधी बोलतो झणझणीत मी
शब्दांचीच देऊन फोडणी
कधी बसतात अडकून माझ्याच
शब्दांचीच गळ्यात लोढणी
घालतो जेव्हा वाद विवाद ही
शब्दांचेच मी खेळतो खेळ
सापडतो जेव्हा अडचणीत मी
शब्दांनीच मारून नेतो वेळ
कधी कोणाची उगाच आपली
शब्दांनीच मी काढतो कळ
कधी कधी भांडण तंट्यात
शब्दांचेच मी वापरतो बळ
लक्षात जरी येत नसलं
शब्दांत तरीही असते कला
इतर कोणाला दिसत नसलं
शब्दांत दिसतं सौंदर्य मला
--- लबाड बोका
शब्दच दिसतात जिथे तिथे
शब्दांचंच मला लागलंय वेड
काढावीशी वाटली कोणाची
शब्दांनीच मी काढतो छेड
करायच्या जरी झाल्या तरी
शब्दांनीच मी करतो चुका
आणि घ्यावासा वाटला तर
शब्दांनीच मी घेतो मुका
कधी बोलतो झणझणीत मी
शब्दांचीच देऊन फोडणी
कधी बसतात अडकून माझ्याच
शब्दांचीच गळ्यात लोढणी
घालतो जेव्हा वाद विवाद ही
शब्दांचेच मी खेळतो खेळ
सापडतो जेव्हा अडचणीत मी
शब्दांनीच मारून नेतो वेळ
कधी कोणाची उगाच आपली
शब्दांनीच मी काढतो कळ
कधी कधी भांडण तंट्यात
शब्दांचेच मी वापरतो बळ
लक्षात जरी येत नसलं
शब्दांत तरीही असते कला
इतर कोणाला दिसत नसलं
शब्दांत दिसतं सौंदर्य मला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा