६४०. नवी दृष्टी
जसजसं वाढतंय वय
तसतशी वाढतेय समज
कित्ती होते जपले मनात
आत्ता पर्यंत गैरसमज
का आवडतो देश आणि धर्म
हादरलो मी सत्त्य जाणून
चांगले आहेत म्हणून नाही
तर मी त्यात जन्मलो म्हणून
हलून गेलो मग मुळापासून
लाभलीय पण नवीन दृष्टी
आत्ता फक्त जवळ करतो
सगळ्यांच्याच चांगल्या गोष्टी
--- लबाड बोका
जसजसं वाढतंय वय
तसतशी वाढतेय समज
कित्ती होते जपले मनात
आत्ता पर्यंत गैरसमज
का आवडतो देश आणि धर्म
हादरलो मी सत्त्य जाणून
चांगले आहेत म्हणून नाही
तर मी त्यात जन्मलो म्हणून
हलून गेलो मग मुळापासून
लाभलीय पण नवीन दृष्टी
आत्ता फक्त जवळ करतो
सगळ्यांच्याच चांगल्या गोष्टी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा