६४१. नाटक - २
समाजामध्ये वावरताना
वापरावा लागतो मुखवटा
दुख्ख झालं नसलं तरी
पाळावा लागतो दुखवटा
फुटत असल्या उकळ्या तरी
बसावं लागतं स्वस्थ
आलतू फालतू गोष्टींनाही
म्हणावं लागतं मस्त
बघू नये तोंड अशांना
द्यावा लागतो मान
सगळं माहित असून सुद्धा
भासवावं लागतं अजाण
हवं असतं ते मिळत नाही
करावी लागते तडजोड
पदरात पडलेलं काही सुद्धा
मानावं लागतं गोड
धुमसत असतो आतून तरी
दाखवावा लागतो विनय
मरत असूनही जगण्याचा
करावा लागतो अभिनय
नियती समोर साले आपण
ठरतो क्षुद्र कीटक
जगणं म्हणजे असतं शेवटी
फक्त एक नाटक
--- लबाड बोका
समाजामध्ये वावरताना
वापरावा लागतो मुखवटा
दुख्ख झालं नसलं तरी
पाळावा लागतो दुखवटा
फुटत असल्या उकळ्या तरी
बसावं लागतं स्वस्थ
आलतू फालतू गोष्टींनाही
म्हणावं लागतं मस्त
बघू नये तोंड अशांना
द्यावा लागतो मान
सगळं माहित असून सुद्धा
भासवावं लागतं अजाण
हवं असतं ते मिळत नाही
करावी लागते तडजोड
पदरात पडलेलं काही सुद्धा
मानावं लागतं गोड
धुमसत असतो आतून तरी
दाखवावा लागतो विनय
मरत असूनही जगण्याचा
करावा लागतो अभिनय
नियती समोर साले आपण
ठरतो क्षुद्र कीटक
जगणं म्हणजे असतं शेवटी
फक्त एक नाटक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा