६४२. कबुली
देव आत्मा पुनर्जन्म
आहेत की नाहीत जगात
माहित नाही मलाही खरंतर
मी ही आहे संभ्रमात
करत नाही कधीच मी
दावा कोणताच एकांगी
काहीच नाही पाहिलंय मी
ऐकलीय सांगोवांगी
अजून पर्यंत तरी हे सारे
आहेत केवळ तर्क
पुराव्यांशिवाय विश्वासायला
नाही काही मी मूर्ख
सत्य जाणून घेण्यासाठी
ठेवलीत कवाडं खुली
आहे त्याबाबतीत अडाणी मी
देतो स्पष्ट कबुली
--- लबाड बोका
देव आत्मा पुनर्जन्म
आहेत की नाहीत जगात
माहित नाही मलाही खरंतर
मी ही आहे संभ्रमात
करत नाही कधीच मी
दावा कोणताच एकांगी
काहीच नाही पाहिलंय मी
ऐकलीय सांगोवांगी
अजून पर्यंत तरी हे सारे
आहेत केवळ तर्क
पुराव्यांशिवाय विश्वासायला
नाही काही मी मूर्ख
सत्य जाणून घेण्यासाठी
ठेवलीत कवाडं खुली
आहे त्याबाबतीत अडाणी मी
देतो स्पष्ट कबुली
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा