६३८. कमी - जास्त
प्रत्येक जणच असतो वागत
कधी चुकीचं कधी रास्त
प्रत्येकालाच असते बुद्धी
कोणाची कमी कोणाची जास्त
प्रत्येकाच्याच मनामध्ये
कोणी भासतं कोणी असतं
प्रत्येक जणच करतो प्रेम
कोणी कमी कोणी जास्त
प्रत्येकालाच असतं वाटत
कोणी सुस्त कोणी मस्त
प्रत्येकालाच असतं सौंदर्य
कोणाचं कमी कोणाचं जास्त
प्रत्येकाच्याच काळजाला
काही डसतं काही ठसतं
प्रत्येक जणच असतो रडत
कोणी कमी कोणी जास्त
प्रत्येकालाच असतं करत
कोणी ग्रस्त कोणी त्रस्त
सगळेच असतात मनोरुग्ण
कोणी कमी कोणी जास्त
--- लबाड बोका
प्रत्येक जणच असतो वागत
कधी चुकीचं कधी रास्त
प्रत्येकालाच असते बुद्धी
कोणाची कमी कोणाची जास्त
प्रत्येकाच्याच मनामध्ये
कोणी भासतं कोणी असतं
प्रत्येक जणच करतो प्रेम
कोणी कमी कोणी जास्त
प्रत्येकालाच असतं वाटत
कोणी सुस्त कोणी मस्त
प्रत्येकालाच असतं सौंदर्य
कोणाचं कमी कोणाचं जास्त
प्रत्येकाच्याच काळजाला
काही डसतं काही ठसतं
प्रत्येक जणच असतो रडत
कोणी कमी कोणी जास्त
प्रत्येकालाच असतं करत
कोणी ग्रस्त कोणी त्रस्त
सगळेच असतात मनोरुग्ण
कोणी कमी कोणी जास्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा