६४३. भयानक
साधं सोपं आयुष्य जगणं
झालं आहे अवघड
किडनीमध्ये असतील बघ
लहान मोठे दगड
दुरूनच दिसतो फक्त
छान सुंदर चंद्र
बघ जरा नीट खाली
झालं असेल भगेंद्र
दिसतो तेवढा नसतो काही
कधीच कोणताच बिंदू
तपासून घे झाले असतील
डोळ्यांत मोतीबिंदू
छोट्या गाठीची मोठी गाठ
करू नकोस तर्क
पसरला असेल बघ शरीरात
कुठेतरी कर्क
महाग झालंय जगणं आणि
महाग झालंय सरण
बघ आता येईल तुला
बऱ्याच लवकर मरण
--- लबाड बोका
साधं सोपं आयुष्य जगणं
झालं आहे अवघड
किडनीमध्ये असतील बघ
लहान मोठे दगड
दुरूनच दिसतो फक्त
छान सुंदर चंद्र
बघ जरा नीट खाली
झालं असेल भगेंद्र
दिसतो तेवढा नसतो काही
कधीच कोणताच बिंदू
तपासून घे झाले असतील
डोळ्यांत मोतीबिंदू
छोट्या गाठीची मोठी गाठ
करू नकोस तर्क
पसरला असेल बघ शरीरात
कुठेतरी कर्क
महाग झालंय जगणं आणि
महाग झालंय सरण
बघ आता येईल तुला
बऱ्याच लवकर मरण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा