६४४. कुतरे
वाटलं होतं मला खरंतर
भेटतील इथे माणसं
पण पहायला मिळालं ते
चित्र नव्हतं छानसं
घेतला आहे सर्वांनी ताबा
एका एका रंगावर
विद्वेषाने भारून मग
येतात सरळ अंगावर
एकापेक्षा एक तसे
आहेत इथे विद्वान
तरीसुद्धा झाले आहेत
स्वत:हूनच श्वान
जरा बोललं खरं तरी
मिळतात फक्त दुरूत्तरे
मालकांनाही माहित नसतं
आपलेच आहेत हे कुतरे
--- लबाड बोका
वाटलं होतं मला खरंतर
भेटतील इथे माणसं
पण पहायला मिळालं ते
चित्र नव्हतं छानसं
घेतला आहे सर्वांनी ताबा
एका एका रंगावर
विद्वेषाने भारून मग
येतात सरळ अंगावर
एकापेक्षा एक तसे
आहेत इथे विद्वान
तरीसुद्धा झाले आहेत
स्वत:हूनच श्वान
जरा बोललं खरं तरी
मिळतात फक्त दुरूत्तरे
मालकांनाही माहित नसतं
आपलेच आहेत हे कुतरे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा