६५४. स्वयंचीत
साधे सोपेच प्रश्न असतात
उत्तरंही असतात साधी
तरीही लागतात भांडायला
काही बोलण्याआधी
ऐकूनच घेत नाहीत साधं
आपलंच बसतात रेटत
संस्कार संस्कृती शिष्टाचारांना
सरळ असतात कुटत
घालतात गोंधळ इतका की
राईचा करतात पर्वत
दुसऱ्यांपेक्षा तेच असतात
स्वत:च स्वत:ला हरवत
--- लबाड बोका
साधे सोपेच प्रश्न असतात
उत्तरंही असतात साधी
तरीही लागतात भांडायला
काही बोलण्याआधी
ऐकूनच घेत नाहीत साधं
आपलंच बसतात रेटत
संस्कार संस्कृती शिष्टाचारांना
सरळ असतात कुटत
घालतात गोंधळ इतका की
राईचा करतात पर्वत
दुसऱ्यांपेक्षा तेच असतात
स्वत:च स्वत:ला हरवत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा