६५३. मुर्दाड
मी मांडतो कवितेमधून
माझ्या मनातलं दुख्ख
ते सुद्धा वाचून माणसं
वा वा म्हणतात चक्क
कधी कधी मी कवितेमधून
मारतो कोपरखळ्या
ज्यांना मारतो ते सुद्धा
पिटत असतात टाळ्या
कधी कधी तर करतो मी
कोणावर तरी टीका
तरी सुद्धा रंग त्यांचा
पडत नाही फिका
कधी कधी मी मांडतो सत्त्य
खोडतो श्रद्धा अंध
सगळे मिळून पाडू पहातात
माझाच आवाज बंद
भल्या बुऱ्याची सुद्धा आता
राहिली नाही चाड
अशी कशी माणसं साली
झाली आहेत मुर्दाड
--- लबाड बोका
मी मांडतो कवितेमधून
माझ्या मनातलं दुख्ख
ते सुद्धा वाचून माणसं
वा वा म्हणतात चक्क
कधी कधी मी कवितेमधून
मारतो कोपरखळ्या
ज्यांना मारतो ते सुद्धा
पिटत असतात टाळ्या
कधी कधी तर करतो मी
कोणावर तरी टीका
तरी सुद्धा रंग त्यांचा
पडत नाही फिका
कधी कधी मी मांडतो सत्त्य
खोडतो श्रद्धा अंध
सगळे मिळून पाडू पहातात
माझाच आवाज बंद
भल्या बुऱ्याची सुद्धा आता
राहिली नाही चाड
अशी कशी माणसं साली
झाली आहेत मुर्दाड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा