६४९. यमकं
अक्षराला अक्षर जुळवून फक्त
होत नाहीत यमकं
त्यांच्या सोबत असावं लागतं
आणखीही काही नेमकं
यमकं आणतात कवितेमध्ये
एक वेगळीच गोडी
यमकं पकडतात बरोबर
वाचणाऱ्याची नाडी
यमकांची जागा असली जरी
संपूर्ण वाक्याच्या शेवटी
यमकं निभावतात भूमिका
सगळ्यात एकदम चोखटी
कधी जुळतात आपोआप
कधी लागतात जुळवावी
यमकं सुद्धा लागतात
योग्य अर्थात घोळवावी
यमकं वाटतात कवितेचा
एक सुंदर अलंकार
यमकं असतात खरंतर
कवी मनाचा हुंकार
--- लबाड बोका
अक्षराला अक्षर जुळवून फक्त
होत नाहीत यमकं
त्यांच्या सोबत असावं लागतं
आणखीही काही नेमकं
यमकं आणतात कवितेमध्ये
एक वेगळीच गोडी
यमकं पकडतात बरोबर
वाचणाऱ्याची नाडी
यमकांची जागा असली जरी
संपूर्ण वाक्याच्या शेवटी
यमकं निभावतात भूमिका
सगळ्यात एकदम चोखटी
कधी जुळतात आपोआप
कधी लागतात जुळवावी
यमकं सुद्धा लागतात
योग्य अर्थात घोळवावी
यमकं वाटतात कवितेचा
एक सुंदर अलंकार
यमकं असतात खरंतर
कवी मनाचा हुंकार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा