६५२. अलिप्त
आताशा मी ठेवत नाही
कोणाकडूनच अपेक्षा
तेच जास्त चांगलं असतं
अपेक्षाभंगापेक्षा
तसाच आता ठेवत नाही
कोणावरही विश्वास
केला ज्यांनी घात माझा
ते ही होते खास
बरंच काही शिकलो आहे
सगळ्या अनुभवांतून
आठवण जरी झाली तरी
पिळवटून येतं आतून
प्रत्येकाच्याच मनात होतं
काही ना काही सुप्त
तेव्हा मग रहायचं ठरवलं
सगळ्यापासून अलिप्त
--- लबाड बोका
आताशा मी ठेवत नाही
कोणाकडूनच अपेक्षा
तेच जास्त चांगलं असतं
अपेक्षाभंगापेक्षा
तसाच आता ठेवत नाही
कोणावरही विश्वास
केला ज्यांनी घात माझा
ते ही होते खास
बरंच काही शिकलो आहे
सगळ्या अनुभवांतून
आठवण जरी झाली तरी
पिळवटून येतं आतून
प्रत्येकाच्याच मनात होतं
काही ना काही सुप्त
तेव्हा मग रहायचं ठरवलं
सगळ्यापासून अलिप्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा