६५१. नाती
काही येतात जुळून
काही लागतात जुळवावी
नाती सुद्धा लागतात
मनामध्ये रुळवावी
उभ्या आडव्या संबंधांच्या
कधी चुकतात जागा
नाती असतात जवळची
तरीही होतो त्रागा
येत नाही लक्षात कधी
काय संबंध नेमका
सहज सुंदर नात्यांमध्ये
निघतो कोणी खमका
कोणाचा तरी लागत असतो
मध्येच चिरका स्वर
कोणी तरी असतो तिरका
वाढवत असतो ज्वर
काही नाती असतात
कधीची विस्कटलेली
नकोशी वाटली तरीही
असतात चिकटलेली
काही वाटतात हवीशी
काही असतात मातलेली
नाती असतात सगळीच
एकमेकांत गुंतलेली
--- लबाड बोका
काही येतात जुळून
काही लागतात जुळवावी
नाती सुद्धा लागतात
मनामध्ये रुळवावी
उभ्या आडव्या संबंधांच्या
कधी चुकतात जागा
नाती असतात जवळची
तरीही होतो त्रागा
येत नाही लक्षात कधी
काय संबंध नेमका
सहज सुंदर नात्यांमध्ये
निघतो कोणी खमका
कोणाचा तरी लागत असतो
मध्येच चिरका स्वर
कोणी तरी असतो तिरका
वाढवत असतो ज्वर
काही नाती असतात
कधीची विस्कटलेली
नकोशी वाटली तरीही
असतात चिकटलेली
काही वाटतात हवीशी
काही असतात मातलेली
नाती असतात सगळीच
एकमेकांत गुंतलेली
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा