६५७. रात्र
कुठूनतरी येतोय आवाज
काहीतरी पडण्याचा
रात्रीसुद्धा करतोय कावळा
कर्कश्श अशी क्रॉव क्रॉव
कुत्रासुद्धा भुंकतोय सारखा
का ते नाही कळत
मिट्ट काळोख आहे बाहेर
दिसत नाही काहीच
वारासुद्धा सुटलाय वाटतं
पानांची येतेय सळसळ
कोणीतरी गेलं धावत
एकदम खाऊन जीव
बरंच काही घडतं आहे
बाहेर अवती भवती
छातीमध्ये वाढलीय धडधड
जाणवते आहे स्पष्ट
अचानकच झालं शांत सगळं
कसलीच नाही चाहूल
कधी ते पण कळलंच नाही
लागली मला झोप
--- लबाड बोका
कुठूनतरी येतोय आवाज
काहीतरी पडण्याचा
रात्रीसुद्धा करतोय कावळा
कर्कश्श अशी क्रॉव क्रॉव
कुत्रासुद्धा भुंकतोय सारखा
का ते नाही कळत
मिट्ट काळोख आहे बाहेर
दिसत नाही काहीच
वारासुद्धा सुटलाय वाटतं
पानांची येतेय सळसळ
कोणीतरी गेलं धावत
एकदम खाऊन जीव
बरंच काही घडतं आहे
बाहेर अवती भवती
छातीमध्ये वाढलीय धडधड
जाणवते आहे स्पष्ट
अचानकच झालं शांत सगळं
कसलीच नाही चाहूल
कधी ते पण कळलंच नाही
लागली मला झोप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा