६५८. गुरुदक्षिणा
आज आहे गुरू पौर्णिमा तर
मानतो तुमचे आभार
तुमच्यामुळेच करीन म्हणतो
भवसागर हा पार
तुम्हीच देता साथ मला
तुम्हीच देत असता हात
तावून सुलाखून निघण्यासाठी
तुम्हीच असता करत घात
तुम्हीच शिकवलीत महाकाव्यं मला
तुम्हीच शिकवल्यात ओव्या
तुम्हीच करता कौतुक माझं
तुम्हीच घालता शिव्या
तुम्हीच आहात गुरू माझे
म्हणून तुमच्याशी बोलतो नीट
तुमच्या कडूनच शिकत असतो
काही चांगलं काही वाईट
--- लबाड बोका
आज आहे गुरू पौर्णिमा तर
मानतो तुमचे आभार
तुमच्यामुळेच करीन म्हणतो
भवसागर हा पार
तुम्हीच देता साथ मला
तुम्हीच देत असता हात
तावून सुलाखून निघण्यासाठी
तुम्हीच असता करत घात
तुम्हीच शिकवलीत महाकाव्यं मला
तुम्हीच शिकवल्यात ओव्या
तुम्हीच करता कौतुक माझं
तुम्हीच घालता शिव्या
तुम्हीच आहात गुरू माझे
म्हणून तुमच्याशी बोलतो नीट
तुमच्या कडूनच शिकत असतो
काही चांगलं काही वाईट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा