६५९. जुगार
एक लावला तर दोन येतो
दोन लावला तर तीन
काय करावं कळत नाही
मनाला येतो शीण
कितीही चालवलं डोकं तरी
उलटंच येतं पान
चुकून माकून कधीतरी
पदरात पडतं दान
माहित असतं हरणार तरी
रोज लावतो आकडा
नशिबावरच्या विश्वासाला
रोजच जातो तडा
होत असतं नुकसान तरी
येत नाही भान
कळतं पण वळत नाही
बुद्धीच पडते गहाण
रोज असतो आशेवरती
रोज होतो विरस
तरीसुद्धा सट्ट्याशिवाय
आयुष्य वाटतं निरस
लागलं आहे व्यसन आता
वाटत नाही घ्यावी माघार
नाहीतरी सालं आयुष्य सुद्धा
आहेच ना एक जुगार
--- लबाड बोका
एक लावला तर दोन येतो
दोन लावला तर तीन
काय करावं कळत नाही
मनाला येतो शीण
कितीही चालवलं डोकं तरी
उलटंच येतं पान
चुकून माकून कधीतरी
पदरात पडतं दान
माहित असतं हरणार तरी
रोज लावतो आकडा
नशिबावरच्या विश्वासाला
रोजच जातो तडा
होत असतं नुकसान तरी
येत नाही भान
कळतं पण वळत नाही
बुद्धीच पडते गहाण
रोज असतो आशेवरती
रोज होतो विरस
तरीसुद्धा सट्ट्याशिवाय
आयुष्य वाटतं निरस
लागलं आहे व्यसन आता
वाटत नाही घ्यावी माघार
नाहीतरी सालं आयुष्य सुद्धा
आहेच ना एक जुगार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा