६६०. सन्मान
मला मिळालं तर मी खाईन
तुला मिळालं तर तू खा
सगळ्यांनाच तर लागत असतात
आपल्या आपल्या भुका
गरीब श्रीमंत पाहू नकोस
सगळ्यांनाच समज बकरे
कोणीच नसतात गायी आणि
कोणीच नसतात डुकरे
वाटून घेऊ नकोस काही
सगळ्यांनाच ते असतं माहित
आपण नसतो कोणी त्यांचे
तेही आपले कोणी नाहीत
घाबरू तर अजिबातच नकोस
कोणी करू शकत नाही वाकडे
वर पर्यंत पोहचत असतात
ज्याचे त्याचे ह्यातलेच आकडे
नशिबानेच घातलंय दान पदरात
करू नकोस उगाच अनमान
आपल्या सारख्यांचाच तर होत असतो
समाजामध्ये नेहमी सन्मान
--- लबाड बोका
मला मिळालं तर मी खाईन
तुला मिळालं तर तू खा
सगळ्यांनाच तर लागत असतात
आपल्या आपल्या भुका
गरीब श्रीमंत पाहू नकोस
सगळ्यांनाच समज बकरे
कोणीच नसतात गायी आणि
कोणीच नसतात डुकरे
वाटून घेऊ नकोस काही
सगळ्यांनाच ते असतं माहित
आपण नसतो कोणी त्यांचे
तेही आपले कोणी नाहीत
घाबरू तर अजिबातच नकोस
कोणी करू शकत नाही वाकडे
वर पर्यंत पोहचत असतात
ज्याचे त्याचे ह्यातलेच आकडे
नशिबानेच घातलंय दान पदरात
करू नकोस उगाच अनमान
आपल्या सारख्यांचाच तर होत असतो
समाजामध्ये नेहमी सन्मान
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा