६६३. धडा
काय होतं भविष्यात माझ्या
काहीच नव्हतं माहिती
मांजर खेळवतं उंदराला तशी
खेळवत होती नियती
केले प्रयत्न कितीतरी मी
फोडण्यासाठी कोंडी
जितके केले जास्त तितकी
अजूनच अडकली मुंडी
लढवलं डोकं किती तरीही
उलटेच पडले फासे
पडलंच नाही दान पदरात
झाले फक्त हसे
वाटत होता विश्वास मला
माझ्या बुद्धी वरती
दोन पावले तिच्याही पुढे
चालत होती नियती
अनुभवांतून आता पर्यंतच्या
शिकलो धडा हा ही
नशिबापुढे बुद्धीचंही
चालत नाही काही
--- लबाड बोका
काय होतं भविष्यात माझ्या
काहीच नव्हतं माहिती
मांजर खेळवतं उंदराला तशी
खेळवत होती नियती
केले प्रयत्न कितीतरी मी
फोडण्यासाठी कोंडी
जितके केले जास्त तितकी
अजूनच अडकली मुंडी
लढवलं डोकं किती तरीही
उलटेच पडले फासे
पडलंच नाही दान पदरात
झाले फक्त हसे
वाटत होता विश्वास मला
माझ्या बुद्धी वरती
दोन पावले तिच्याही पुढे
चालत होती नियती
अनुभवांतून आता पर्यंतच्या
शिकलो धडा हा ही
नशिबापुढे बुद्धीचंही
चालत नाही काही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा