६६५. खरंतर
काढत असतो संभावितपणे
सर्वांची मी मापं
मी सुद्धा खरंतर
केली आहेत पापं
सर्वांसमोर गातो मी
सुंदर सुंदर ओव्या
देत असतो खरंतर
मनामधून शिव्या
अन्याय ग्रस्तांसाठी मी
मागत असतो न्याय
मीच केलाय खरंतर
कित्येकांवर अन्याय
समाजातल्या दुष्प्रवृत्तींशी
घालत असतो वाद
मला सुद्धा खरंतर
आहेत सगळे नाद
कायदे कानून पाळण्याचा
सांगतो लोकांना फायदा
संधी मिळताच खरंतर
मी ही तोडतो कायदा
माझ्या शालीन वागण्याने
सजवतो मी बैठक
करत असतो खरंतर मी
सुसंस्कृतपणाचं नाटक
बायकांशी तर बोलतो मी
इतकं काही लाघवी
मनामधून खरंतर
पहात असतो नागवी
कळत नाही का मला
समजतात लोक सभ्य
मी सुद्धा आहे खरंतर
त्यांच्यासारखाच असभ्य
--- लबाड बोका
काढत असतो संभावितपणे
सर्वांची मी मापं
मी सुद्धा खरंतर
केली आहेत पापं
सर्वांसमोर गातो मी
सुंदर सुंदर ओव्या
देत असतो खरंतर
मनामधून शिव्या
अन्याय ग्रस्तांसाठी मी
मागत असतो न्याय
मीच केलाय खरंतर
कित्येकांवर अन्याय
समाजातल्या दुष्प्रवृत्तींशी
घालत असतो वाद
मला सुद्धा खरंतर
आहेत सगळे नाद
कायदे कानून पाळण्याचा
सांगतो लोकांना फायदा
संधी मिळताच खरंतर
मी ही तोडतो कायदा
माझ्या शालीन वागण्याने
सजवतो मी बैठक
करत असतो खरंतर मी
सुसंस्कृतपणाचं नाटक
बायकांशी तर बोलतो मी
इतकं काही लाघवी
मनामधून खरंतर
पहात असतो नागवी
कळत नाही का मला
समजतात लोक सभ्य
मी सुद्धा आहे खरंतर
त्यांच्यासारखाच असभ्य
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा