६६६. मख्ख
हे ही दिवस जातील म्हणताना
वर्षे गेली निघून
तरीही वेड्या आशेवरती
आहे अजून तगून
अडचणी काही संपत नाहीत
संपत आलंय आयुष्य
तरीही उगाच वाटत रहातं
उज्ज्वल असेल भविष्य
दिसत नाही मार्ग काही
चाचपडतोच आहे अजून
सगळे गेले निघून पुढे
मी चाललोय मागून
पूर्वी वाटायचं वाईट आणि
व्हायचं खूप दुख्ख
आता काही वाटत नाही
झालो आहे मख्ख
--- लबाड बोका
हे ही दिवस जातील म्हणताना
वर्षे गेली निघून
तरीही वेड्या आशेवरती
आहे अजून तगून
अडचणी काही संपत नाहीत
संपत आलंय आयुष्य
तरीही उगाच वाटत रहातं
उज्ज्वल असेल भविष्य
दिसत नाही मार्ग काही
चाचपडतोच आहे अजून
सगळे गेले निघून पुढे
मी चाललोय मागून
पूर्वी वाटायचं वाईट आणि
व्हायचं खूप दुख्ख
आता काही वाटत नाही
झालो आहे मख्ख
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा