६६४. संभ्रम
चालूच आहे जन्मापासून
दिशाहीन प्रवास ़
कळत नाही अजूनही
कशाची धरावी कास
हरएक पावलावरती
फुटतात दोन मार्ग
कळत नाही नरक कुठे
कुठे आहे स्वर्ग
विवेक आणि अविवेकाचं
चालूच असतं भांडण
कळत नाही कसं करावं
नेमकं कुणाचं खंडण
संपत आलाय प्रवास आता
पडू लागलंय सावट
कळत नाही होणार सुरू की
होणार आहे शेवट
--- लबाड बोका
चालूच आहे जन्मापासून
दिशाहीन प्रवास ़
कळत नाही अजूनही
कशाची धरावी कास
हरएक पावलावरती
फुटतात दोन मार्ग
कळत नाही नरक कुठे
कुठे आहे स्वर्ग
विवेक आणि अविवेकाचं
चालूच असतं भांडण
कळत नाही कसं करावं
नेमकं कुणाचं खंडण
संपत आलाय प्रवास आता
पडू लागलंय सावट
कळत नाही होणार सुरू की
होणार आहे शेवट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा