६६७. ओळख
स्वत:हून उडत नाही पतंग
जातो नेहमीच उडवला
पडतो जेव्हा जमिनीवर
जातो पायदळी तुडवला
गरुड उडतो आकाशात
नेहमीच स्वबळावर
घालू शकत नाही त्याला
दुसरा कोणी आवर
गगन भराऱ्या पाहून जरी
पडतं मनावर गारुड
ओळखता मात्र आलं पाहिजे
पतंग आहे की गरुड
--- लबाड बोका
स्वत:हून उडत नाही पतंग
जातो नेहमीच उडवला
पडतो जेव्हा जमिनीवर
जातो पायदळी तुडवला
गरुड उडतो आकाशात
नेहमीच स्वबळावर
घालू शकत नाही त्याला
दुसरा कोणी आवर
गगन भराऱ्या पाहून जरी
पडतं मनावर गारुड
ओळखता मात्र आलं पाहिजे
पतंग आहे की गरुड
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा