६६८. आपलं आपलं
थकून भागून गेल्यावरती
आपणच आपली करावी कीव
आणि शेवटी विचारपूर्वक
आपणच आपला घ्यावा जीव
होणारच तर असतं म्हणून
आपणच आपलं करावं वाकडं
इथून तिथून गोळा करून
आपणच आपली रचावी लाकडं
बसू नये बघत वाट
आपणच आपली दाबावी नरडी
हवी तशी सोयीस्करशी
आपणच आपली बांधावी तिरडी
कोणी नाही होत भागी
आपणच आपली भोगावी भोगणी
आपणच आपल्या हातांनी मग
आपणच आपला द्यावा अग्नी
--- लबाड बोका
थकून भागून गेल्यावरती
आपणच आपली करावी कीव
आणि शेवटी विचारपूर्वक
आपणच आपला घ्यावा जीव
होणारच तर असतं म्हणून
आपणच आपलं करावं वाकडं
इथून तिथून गोळा करून
आपणच आपली रचावी लाकडं
बसू नये बघत वाट
आपणच आपली दाबावी नरडी
हवी तशी सोयीस्करशी
आपणच आपली बांधावी तिरडी
कोणी नाही होत भागी
आपणच आपली भोगावी भोगणी
आपणच आपल्या हातांनी मग
आपणच आपला द्यावा अग्नी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा